एक पत्र
प्रिय आजोबा, आम्ही सगळे ठीक, म्हणजे आई नेहमी रडत असते आणि आजी एकटी पडलीय पण तरीही आम्ही सगळे ठीक आहोत. पप्पांनी रोज जेवण झाल की तुमच नाव घ्यायचं आणि 'गुंजे गुरुजी ग हेळु आदु थोडे आव आष्टु खळस कुडु आणव' किंवा जेवताना पाणी दिल नाही तर हसत हसत 'गुंजे गुरुजी कलसीला येणु' अस म्हणायच पण बंद केलय, पण तरीही आम्ही सगळे ठीक आहोत. दसरा येत आहे आणि तुम्ही कॉल करुन (पप्पांना कॉल, आम्हाला किंवा तुमच्या स्वतःच्या मुलीला नव्हे) आम्हाला शुभेच्छा देणार नाही किंवा प्रत्येक सणाला तुमचा सकाळी सकाळी न चुकता कॉल येणार नाही ही गोष्ट पचत नाहिये, पण तरीही.. आम्ही सगळे ठीक आहोत. (आमची विठू माऊली! ) तुम्हाला आठवतय आजोबा, 'छावा' पुस्तकासाठी भांडला होता तुम्ही माझ्याशी. मला फक्त वाचण्यासाठी ते पुस्तक पुण्याला घेऊन यायच होत आणि नंतर मी परत सुद्धा करणार होते पण तुमचा त्या अगदी फाटून चिंध्या झालेल्या पुस्तकासाठी अट्टाहास - 'वाचायचे तर इथेच वाच, मी माझ पुस्तक देणार नाही', ते पाहून मी शॉक झाले होते. तर ते पुस्तक भेटल बर का मला, अगदी तसच आहे ते, फाटून चिंध्या झालेल! तुमचा खजिना सुद्धा प