प्रिय आजोबा....
प्रिय आजोबा, मीच आहे, तुमची आसू. खूप आठवण येत आहे तुमची आजोबा. तुमचा आवाज, तुमच हसू, तुमचा चेहरा सगळ काही राहून राहून मनात घर करून बसल आहे गेले काही दिवस. आम्ही सगळे ठीक. आई सांगत होती तुमच्या शेवटच्या क्षणी तुमच्या खिशात दोनच पेपर होते - एक म्हणजे बँकेचा कोरा चेक आणि दुसरा, मामाचा biodata. अगदी शेवट पर्यन्त तुम्ही ज्याच्या काळजीमध्ये होता ते एक काम पूर्ण झाल बर का.. मामाच लग्न झाल, मामी छान आहे, सगळा कार्यक्रम नीटच संपन्न झाला पण तरीही खूप काही चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत. म्हणजे तुम्ही असता ना तर तुमच्या मागे लागून, 'खूप महाग कपडे घेणार आहे आम्ही' अस उगीचच सांगुन तुमच्याकडे पैसे मागण्यात, तुम्हाला त्रास देण्यात, तुम्हाला चिडवण्यात जी मजा आली असती, ती नाही आली. लग्नात तुमच्या चेहर्यावर जो आनंद, जी प्रसन्नता पाहायची होती, ती सुद्धा नाही जमल पाहायला. बर ते असो.. मी छान आहे, म्हणजे कधी कधी झोपेत असताना तुम्ही भेटायला आलात की रडत रडत माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि मग पूर्ण दिवस हा विचार करण्यात जातो की तुम्ही असता तर कदाचित मी तुमच्याशी काही गोष्टी बोलू शकले असते का? नक्की